कोरेगाव भीमा प्रकरणी सरकार अपयशी; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

congress state president ashok chavan

मुंबई: भीमा कोरेगावमध्ये घडलेली घटना म्हणजे सरकारचे अपयश असून या प्रकरणी जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईमध्ये आयोजित कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांवर सरकारकडून कारवाई केली जात नाहीये. यावरूनच सरकारच्या सरकारच्या मुकसंमतीने जाणिवपूर्वक हे सुरु असल्याच दिसत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली. तसेच भीमा कोरेगाव प्रकरण हे सरकारचं अपयश असल्याची सर्वांची भावना आहे गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला असून सरकार त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.

Loading...

काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिबिरे घेणार असून काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधीच्या काही सभा महाराष्ट्रात झाल्या पाहीजेत अशी नेत्यांची इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस राहुल गांधींना महाराष्ट्रात सभा घेण्याची विनंती करणार आहे अशी माहितीही खा. अशोक चव्हाण यांनी दिली

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले