परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे; मात्र संपावर उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका: अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा: राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. मात्र, अद्याप सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. येन दिवाळीत संप सुरु असल्याने सामन्यांचे हाल होत आहेत. तर आता यावरून राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.

परिवहन मंत्रालय शिवसेनेकडे आहे. तसेच अंगणवाडी सेविकांचा प्रश्न जसा महत्वाचा आहे, त्याप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. मात्र उद्धव ठाकरे यासंदर्भात दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. संपामुळे सामान्य लोकांचे हाल होत असून सरकारने तात्काळ तोडगा काढावा. अशी मागणीही त्यांनी केली आहे.