पुण्यात कॉंग्रेसची ‘नवरदेवा’विनाच लगीनघाई!

congress

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडत नसल्याचे चित्र आहे. भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे मतदारसंघात समाविष्ट विविध भागात कार्यकर्ता बैठक आणि सभा घेत भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे.

तर दुसरीकडे कॉंग्रेस- राष्ट्रवादीसाठी ‘नवरदेवा’चाच पत्ता नसून कार्यकर्ते मात्र वरातीत नाचत असल्याचं दिसत आहे. आज पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नसताना देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे उघड झाले आहे.

मागील दोन महिन्यांपासून कॉंग्रेसकडून विविध नावांची चर्चा आहे, त्यात प्रवीण गायकवाड, मोहन जोशी, अरविंद शिंदे यांची नवे चर्चेत होती. परंतु अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. प्रवीण गायकवाड यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी अधिक मजबूत मानली जात आहे