अफजल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार तर ! – सचिन सावंत

blank

टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये तणाव टोकाला गेला असताना, आज भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता दोघांची भेट होणार आहे. यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अफजल खान उंदीर यांची गळाभेट होणार तर अस उपरोधिक ट्विट करून सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेत्वर टीका केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय विरोधकांच्या एकजुटीचा सत्ताधारी भाजपने चांगलाचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून ‘संपर्क फॉर समर्थन’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गतच अमित शाह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

भाजपकडून शिवसेनेला सोबत घेण्याचे सर्व प्रयत्न सुरु असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेक वेळेस आम्ही शिवसेनेशी युती करण्यासाठी तयार असल्याचं म्हंटलं आहे. मात्र शिवसेना भाजपशी युती करण्यासाठी फारशी अनुकूल नसल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान अमितशहा यांच्या भेटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.