राष्ट्रभक्त? तेच का? जे ब्रिटिशांचे भाट होते, गांधीहत्येनंतर मिठाया वाटल्या; संघावर टीकास्त्र

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे आय-टी सेल महराष्ट्राचे प्रमुख प्रवीण अलई आणि कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्यात ट्विटर वाॅर आता चांगलच रंगल आहे. त्यात अलई यांच्या ट्विटचा समाचार घेत सचिन सावंत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे.

या ट्विटमध्ये ते म्हणाले,  ‘राष्ट्रभक्त? तेच का? जे ब्रिटिशांचे भाट होते, जे स्वातंत्र्यसैनिकांची घरं पोलिसांना दाखवत होते, संविधानाला विरोध करुन मनुस्मृतीचा आग्रह धरला, गांधीहत्येनंतर मिठाया वाटल्या, तिरंग्याला अशुभ म्हणून ५२ वर्षे तिरंगा फडकवला नाही,मुसलमानांचे कपडे घालून दंगे भडकवले इत्यादी…..’

Loading...

हा वाद चालू झाला सचिन सावंत यांच्या एका ट्विटने यात ते म्हणले, ‘सद्विचार व कुविचारांचा संघर्ष मनुष्य अस्तित्वात आल्यापासून आहे. तो प्रत्येकाच्या अंतरंगात ही चालत असतो. म्हणून RSS वर बंदी घालून उपाय सापडेल असे नाही. दुसऱ्या रुपात ते येतील. जगात वेगवेगळ्या रुपात हा विचार आहेच! RSS वर याअगोदर ३दा बंदी घातली. RSS या विचाराचा पराभव झाला पाहिजे.’

 

सचिन सावंत यांच्या या ट्विटवर अलई यांनी उत्तर देत म्हणाले , ‘राष्ट्रीय स्वयंसेवक हा एक राष्ट्रीय विचार आहे आणि तो लाखो घरात राष्ट्रभक्ता पर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे आपण नेमका पराभव कुणाचा करणार? राष्ट्रभक्ताचा? राष्ट्रीय स्वयंसेवकाचा?.’ असा सवाल केला होता.

 

याच्यावर सावंतानी जोरदार पलटवार केला आहे. आता अलई काय उत्तर देताय हे पाहावं लागेल.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश