fbpx

काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष करा, कॉंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. परंतु कॉंग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. याविषयीच कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोठ विधान केले आहे.

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यात कलम ३७० वरून चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. यात राहुल गांधी यांनी काश्मीरमधील परिस्थिती अशांत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना तेथे जाण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली होती. यावरून मलिक यांनी राहुल गांधी यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. परंतु काही काळानंतर आमंत्रण माघारी घेतले होते. तसेच गांधी यांच्यावर टीकाही केली होती.

या सर्व प्रकरणावरून कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यपाल मलिक यांना भारतीय जनता पार्टीचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे. कारण त्यांच्याकडून करण्यात येणारी विधाने भाजपाच्या नेत्यासारखीच आहे. असा उपरोधिक टोला लगावला आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या या विधानाला भाजप आणि सत्यपाल मलिक कश्या प्रकारे उत्तर देते हे पाहन महत्वाच ठरणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी हे दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर दौऱ्यावर गेले होते. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ देखील होते. मात्र राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं होते. त्यामुळे त्यांना तसेच माघारी परतावे लागले होते. राहुल गांधी हे जम्मू काश्मीरचे कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काश्मीरला गेले होते.