मुंबई : महाविकास आघाडी सरकारने जवळपास दीड वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून पुढील निवडणुकांनंतर देखील आम्हालाच सत्ता मिळेल असा विश्वास मविआ नेते व्यक्त करत आहेत. मात्र, या तीन पक्षांमधील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काँग्रेसला दुय्यम वागणूक दिली जात आल्याची तक्रार काँग्रेस नेत्यांनी केली होती. तर, मित्र पक्षातील नेते फोडण्यावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आता कोरोना रोगाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला असताना महाविकास आघडीतील नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलं आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचं आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
दरम्यान, आमदार सिद्दीकी यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांचं समर्थन केलं आहे. ‘महाविकास आघाडीचे हे सरकार आहे या सरकारमधील घटक पक्ष आहे त्यांचा सन्मान व्हायला हवा. सिद्धीकी यांनी जे काही म्हटले आहे ते चुकीचे नाही आपल्या राज्यात परंपरा पाळली गेली आहे,’ असं नाना पटोले म्हणाले आहेत.
यासोबतच, ‘ज्या विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमाचे तिथल्या स्थानिक आमदारला त्या कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी करायला हवा असं राज्यात धोरण आहे. मात्र जर एखादा मंत्री जात असेल आणि त्या ठिकाणी आमदाराला बोलवत नसतील तर चुकीचं आहे. ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी यामध्ये भविष्यात अशा पद्धतीची चूक होऊ नये याबाबत सुधारणा करावी ही त्यांना विनंती आहे,’ अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.
अनिल परबांवर गंभीर आरोप –
‘अनिल परब हे करत आले आहेत. यापूर्वी सुद्धा मी जे काही काम करत असेल त्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात. बीएमसी कधी एनओसी देत नाही, कधी उशीरा देतात. जे काही काम मी करण्याचा प्रयत्न करतो त्यात बाधा टाकण्याचा प्रयत्न होतो, मला या दहशतीची सवय आहे. मी काम करत आलो आहे आणि करत राहणार. वांद्रे पूर्व मतदारसंघातील नागरिकांना माहिती आहे की कोण खरोखर काम करतं. अनिल परब हे ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांनी समजून घ्यायला हवं की नागरिकांनी मला निवडून दिलं आहे आणि मला काम करू दिलं पाहिजे,’ असं भाष्य झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देश सध्या मोदी सरकारच्या दुर्लक्षाच्या गर्तेत बुडतोय’, सोनिया गांधींची टीका
- कोरोनाच्या मुद्द्यावरून ममतांचे मोदींना सलग दोन दिवसांत दोन लेटर
- ‘मोदींकडून लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरू’, पी. चिदंबरम यांचा आरोप
- ‘कोरोनाशी लढा, मोदींसोबत नाही’, केंद्रिय मंत्र्यांचा हेमंत सोरेन यांना टोला
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल