राम जन्मभूमीप्रश्नी कॉंग्रेसने त्यांची भूमिका जाहीर करावी -भाजप

Rg

टीम महाराष्ट्र देशा – भाजपचे मत स्पष्ट आहे, अयोध्येत भगवान रामाचे भव्य मंदिर बनावे मात्र याप्रकरणी काँग्रेसला काय हवं आहे हे राहुल गांधी यांनी जाहीर करावं तसेच त्यांनी मौन सोडावे अशी मागणी भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा राव यांनी केली आहे. राव यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत .

राजकोट येथे भाजप उमदेवाराच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम जन्मभूमीप्रश्नी रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. आता भाजपने याप्रकरणात राहुल गांधींना ओढल्याचे दिसते. अयोध्येतील राम जन्मभूमीप्रकरणी शिया वक्फ बोर्डचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली असून आता याप्रश्नी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मौन सोडून आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.