‘विधानसभा निवडणुकांवेळी लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेस-शिवसेनेची ‘फिक्सिंग’ झाली होती !’

latur gramin

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेला सोडण्यात आलेली जागा मुंबई शहराच्या जागेच्या बदल्यात ‘फिक्सिंग’ झाली होती, असा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. शिवाय विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ दोन नंबरवरती राहिला असा उल्लेखही त्यांनी याप्रसंगी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मतदारांचा अनादर शिवसेनेने केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या विधानसभा निवडणुक फिक्सींगबाबत सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपा यांची युती होती. यावेळी काँग्रेसने दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली होती. धीरज देशमुख यांचा घवघवीत मताधिक्याने विजय झाला होता. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने फिक्सिंग केल्याचा आरोप निलंगेकरांनी केला आहे.

परंतु निवडणुकीनंतर या दोन पक्षांमधील युद्ध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. यामुळे आता शिवसेनेवर टीका करण्याची व त्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे देखील सर्वाना पाहायला मिळत आहे. यामुळे आता संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे आगामी काळातच समजेल.

दरम्यान, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी अजून तरी या आरोपांना कोणतेही उत्तर दिलेले नाहीये. पुढील काळामध्ये नेमके ते या आरोपांचा कसा सामना करणार आहेत हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या