प्रणव मुखर्जींच्या विचारांनी संघात सुधारणा झाली तर आनंदच – सुशीलकुमार शिंदे

sushilkumar shinde

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर कॉंग्रेसमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मात्र आत माजी गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयाची पाठराखण केली आहे.

प्रणव मुखर्जींनी आरएसएसचे निमंत्रण स्वीकारण्यात काहीच चुकीचे नाही. कारण ते एक धर्मनिरपेक्ष आणि विचारशील व्यक्ती आहेत. ते नेहमी धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन जनतेसमोर ठेवतात आणि संघाच्या कार्यक्रमातही ते हीच भूमिका कायम ठेवतील. संघाच्या मंचावरून भाषण देणे खूप महत्वपूर्ण आहे. त्यांच्या विचारांनी संघात सुधारणा झाली तर आम्हाला आनंदच आहे. अस मत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल आहे.

दरम्यान, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाण्याचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुखर्जी यांनी हे आमंत्रण स्वीकारायला नको होते, अशी भावना बोलून दाखवली आहे.