fbpx

पूर कोणामुळे आला ? भाजप-कॉंग्रेसमध्ये रंगला कलगीतुरा

पुणे – सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली भयानक पूरपरिस्थिती आता निवळली आहे. मात्र आता याच मुद्द्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खरं तर पूरग्रस्तांना मदत मिळवून देणे ही राजकीय पक्षांची प्राथमिकता असायला पाहिजे मात्र दुर्दैवाने हे दोन्ही पक्ष राजकारण करण्यात दंग असल्याचे पहायला मिळत आहे.

अद्यापही कोल्हापुरातील पूररेषा बदलली नाही. जी आहे ती 2005च्या पुरावर ठरली. 2005 च्या आधी किंवा नंतर कोल्हापूर महापालिकेत कधीच भाजपची सत्ता नव्हती. त्यामुळे पूररेषेंतर्गत नियमात छेडछाड करून बांधकामांना परवानगी कॉंग्रेसने दिली. केंद्रात, राज्यात आणि कोल्हापूरात त्यांची सत्ता होती. त्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली, असा आरोप करत कोल्हापूरातील पुराला पुणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कॉंग्रेस सरकारला जबाबदार धरले.

सांगली आणि कोल्हापुरात पूर आला तेव्हा भाजप नेते 370 कलम रद्द करण्याच्या जल्लोषात होते. तसेच धरणातून पाणी सोडावे ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी असते. ही जबाबदारी सांभाळता न आल्यानेच अपयश झाकण्यासाठी भाजप पुराचे खापर कॉग्रेसवर फोडत असल्याचा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात केला.

महत्वाच्या बातम्या