अशोक चव्हाणांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेस पक्षाने अखेर स्वीकारला

ashok chawan on adarsh scam

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पराभवाची जबाबदरी स्वीकारत आपला राजीनामा दिला होता. हा राजीनामा आज कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी स्वीकारला आहे. तर प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यात काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा देखील पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देखील थोरातांना देणार असल्याच सांगितल जात आहे. तर २००९  मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांना सभागृहातील कामांचा देखील अनुभव आहे.