fbpx

राधाकृष्ण विखेंचा फैसला राहुल गांधींच करणार…

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे माजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बंड केल्यानंतर काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा नवा नेता कोण याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचे नवे चर्चेत असताना नवा नेता निवडण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय आज एकमताने काँग्रेस आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले असून या पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने या पदावर दलित चेहरा आणावा, अशा हालचाली सुरू आहेत.

नवा विधीमंडळ पक्षनेता ठरवण्याचा सर्वाधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. त्याला आमदार नसीम खान आणि यशोमती ठाकूर यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.