भाषण करताना राहुल गांधी गडबडले; मोदीजी ‘बाहर जाते है’ ऐवजी ‘बार जाते है’चा उल्लेख

टीम महाराष्ट्र देशा: विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत मतदान केले जाणार आहे, याआधी भाषण करत असतांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला केला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या विदेश यात्रांवर बोलत असतांना मोदीजी ‘बाहर जाते है’ ऐवजी ‘बार जाते है’चा उल्लेख त्यांच्याकडून झाला. त्यामुळे भाषणाला सुरुवात करतानाच ते काहीशे गडबडल्याच पहायला मिळालं.

केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पहायला मिळत आहे. सरकारने रोजगाराच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला असं म्हणत राहुल गांधीचं यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. जुमला स्ट्राइक हे भाजपाचे राजकीय अस्त्र असल्याचा आरोप गांधी यांनी केला.

चीन 24 तासात 50 हजार युवकांना रोजगार देतो, मात्र तुम्ही 24 तासात अवघ्या 400 युवकांना रोजगार देत असल्याची टीका गांधी यांनी केली. तसेच देशातील जनता जुमलाबाजीने पिडीत झाली आहे. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार हा मोदींचा पहिला जुमला होता, तर 2 कोटी युवकांना रोजगार हा दुसरा असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान हे मोठ्या उद्योगपतींसाठी काम करतात, सरकारने शेतकरी, बेरोजगार, तरुणांच्या पदरी केवळ भूलथापा टाकल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच नोटाबंदी हा सरकारचा सर्वात मोठा विनोद असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.