fbpx

सर्वोच्च न्यायालयाने राफेलबाबत दिलेल्या निर्णयाचे माझाकडून स्वागत आहे : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने आज राफेल करार प्रकरणाबाबत मोठा निर्णय दिला आहे. तर या निर्णयाच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाला देखील आता कळाले आहे की मोदींच्या राफेल करारा मध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मोदींना अजूनही माझ आव्हान आहे की हिंमत असेल तर माझ्याबरोबर चर्चा करायला याव.

राहुल गांधी म्हणाले की, “मी न्यायालयीन निर्णयांचे स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाने मानले आहे की रफेल डीलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. चौकीदार ने चोरी केली आहे, कोर्टाने हा निर्णय स्पष्ट केला आहे.”

दरम्यान राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दणका दिला आहे. राफेल गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या पुराव्याच्या कागदपत्रांवरील आक्षेप फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. राफेलचा मुद्दा लोकसभेत चांगलाच गाजला होता. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले होते.