राहुल गांधींच्या मंदिर दर्शनाचा काय फायदा ? एकदा हे वाचाच!

rahul gandhi in gujrat temple

विरेश आंधळकर: गुजरात विधानसभा निवडणुकांत एका बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळ, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत होते. तर दुसरीकडे राहुल गांधी हे एकटेच कॉंग्रेसकडून या सर्वाचा सामना करत होते. यामध्ये राहुल यांना साथ मिळाली ती पाटीदार समाजाचा अवघा २३ वर्षाचा असणारा हार्दिक पटेल, दलित चेहरा जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांची.

या निवडणुकीत प्रामुख्याने एक गोष्ठ दिसून आली ती राहुल गांधी यांचे मंदिर दर्शन. राहुल यांच्या मंदिरातील दर्शनावर भाजपकडून टीका देखील करण्यात आली. एकवेळ तर अशी आली कि राहुल हे गैरहिंदू असल्याचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र राहुल यांच्या याच मंदिर डिप्लोमसीमुळे कॉंग्रेसला गुजरातमध्ये चांगलाच फायदा झाल्याच देखील आता दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रचार दौऱ्यात एकूण २७ मंदिरांना भेट दिली.

राहुल गांधींच्या मंदिर दर्शनाचा कॉंग्रेसला झालेला फायदा

. अदिवाशी समुदायासाठी श्रद्धास्थान असणाऱ्या अंबामाता मंदिराला राहुल गांधी यांनी भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांनी देखील या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुजरातमधील ३० विधानसभा क्षेत्रात या मंदिराचा मोठा प्रभाव आहे. या ३० जागांमधील १९ वर कॉंग्रेस तर ११ ठिकाणी भाजपला विजय मिळाला आहे.

rahul gandhi at meghmaya temple gujrat
rahul gandhi at meghmaya temple gujrat ( source-INC/twitter)

२. ओबीसी बहुल क्षेत्र मानल्या जाणऱ्या पाटण जिल्ह्यात मेघमाया मंदिर आहे. गुजरात निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांनी मेघमाया मंदिराला भेट दिली. पाटण आणि मेहसाना जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रात या मंदिराचा प्रभाव दिसून येतो. या ११ जागांमधील ६ वर कॉंग्रेस ते ५ ठिकाणी भाजपला विजय मिळाला आहे.

rahul-gandhi-somnath-temple-
rahul gandhi somnath temple ( spurce – INC)

. सोमनाथ मंदिरातील राहुल गांधी यांची भेट देशभरात चर्चेचा मुद्दा बनली होती. मंदिरातील रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या नोंदीवरून राहुल हे हिंदू नसल्याची टिका करण्यात येत होती. याच मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही भेट दिली. सोमनाथ मंदिर असणाऱ्या जिल्ह्यात ४ विधानसभा जागा आहेत. ज्या जागांवर मागील निवडणुकीत भाजप ३ तर कॉंग्रेस १ जागेवर विजयी झाली होती. मात्र यंदा कॉंग्रेसने चारही ठिकाणी विजय मिळवला आहे.

rahul gnadhi at akshardham temple
rahul gnadhi at akshardham temple

४. पटेल समाजासाठी श्रद्धास्थान असणाऱ्या अक्षरधाम मंदिराला राहुल यांनी दिलेल्या भेटीवरून त्यांची चांगलीच खिल्ली उडवली गेली. दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट न देणारे राहुल गुजरातमधील अक्षरधामला भेट देतात अशी टीका केली गेली. अक्षरधाम मंदिराशी सलग्न असणाऱ्या स्वामी नारायण संप्रदायाचा ३३ विधानसभा क्षेत्रात प्रभाव आहे. ज्यामधील १७ जागांवर कॉंग्रेस तर १६ ठिकाणी भाजपला विजय मिळाला.

५.  द्वारका मंदिरात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी दोघांनीही दर्शन घेतले होते. या मंदिराचा प्रभाव एकूण ९ जागांवर असून यातील ६ ठिकाणी कॉंग्रेस तर दोन जागी भाजपला विजय मिळाला.