काँग्रेस अध्यक्षांना पैसा कळतो देशाची सुरक्षा नाही : जेटली

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षांना पैसा कळतो देश आणि देशाची सुरक्षा कधी समजत नसल्याचे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून लोकसभेत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याला प्रतिउत्तर देताना अरुण जेटलींनी काँगेस अध्यक्षांना फक्त पैस कळतो देशाची सुरक्षा कधी कळणार नाही. राहुल यांना राफेल विमानांच काहीही कळत नाही, राहुल सतत खोटे बोलत असल्याचे यावेळी अरुण जेटली म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची टेप खोटी आहे. त्यामुळेच राहुल गांधी घाबरत आहेत. काँग्रेस संपुआला सरकारला राफेल करार पूर्णत्वास नेता आला नाही. संपुआ सरकारने देश्याच्या सुरक्षेसोबत खेळ केला आहे. राहुल गांधी जे बोलत आहेत ते सर्व खोटे आहे. ते सर्वोच्च न्यायलायच्या विरुद्ध बोलत आहेत. ऑगस्टा वेस्टलँड, नॅशनल हेराल्ड, बोफोर्स या तिन्ही प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव कसे आले असा प्रश्न अरुण जेटली यांनी उपस्थित केला. या तिन्ही प्रकारणावरून राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर जेटलींनी टीका केली.