fbpx

भाजपचा जाहीरनामा म्हणजे आरएसएसचा जाहीरनामा असतो – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यात काँग्रेसने एकूण 4 जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. हे जाहीरनामे प्रत्येक ब्लॉक्स, जिल्हे आणि कम्युनिटीला लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहेत.

‘तुम्ही पाहिलं असेल भाजपचा जाहीरनामा हा 3-4 लोकांना सोबत घेऊन बनवला जातो. त्यांच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार, रेड्डी ब्रदर्सच्य संकल्पना असतात. भाजपचा जाहीरनामा म्हणजे आरएसएसचा जाहीरनामा असतो’, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

– मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण

– शहरी भागात स्वस्त घरं बांधण्यासाठी समिती

– शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी समिती

– वाहतूक व्यवस्थेत सुधारणा

– अल्पसंख्यकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढवणार

– प्रत्येक घराला पिण्याचं पाणी पुरवणार

1 Comment

Click here to post a comment