गुजरात मधील सर्वात सुंदर उमेदवारांच्या व्हायरल फोटो मागील हे सत्य तुम्हाला माहित आहे का ?

congress gujrat model

टीम महाराष्ट्र देशा – गुजरात निवडणुकीमुळे देशभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजप व कॉंग्रेस आमने -सामने आले आहेत. एकमेकांनवर पातळी ओलांडून टीका केली जात आहे. या बरोबरच तगडे उमेदवार देखील उभे केले जात आहेत.

सध्या सोशल माध्यमावर गुजरात मधील एका उमेदवारांचा फोटो सध्या भलताच व्हायरल होत आहे.ही सुंदर मुलगी कोणती मॉडेल नसून ही कॉंग्रेसची गुजरात मधील एक उमेदवार आहे. अशा आशयाचा मेसेज व फोटो व्हायरल होत आहे. हे आहे त्या व्हायरल फोटो मागील सत्य.

भाजपचा गड मानल्या जाणा-या अहमदाबादच्या मणिनगर येथील जागेवर कॉंग्रेसने ही उमेदवार उभी केली आहे. ही उमेदवार ग्लॅमरस असण्यासोबतच आयआयएम-बी ए पासआऊट आहे. या महिला उमेदवाराचं नाव श्वेता ब्रम्हभट्ट आहे.

श्वेता ब्रम्हभट यांच्या पार्श्वभूमीबद्दल सांगायचं तर त्यांचे वडील नरेंद्र ब्रम्हभट हे कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांनी २००० मध्ये अहमदाबादमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवली होती. श्वेता यांनी लंडनच्या वेस्ट मिनस्टर युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. यासोबतच त्यांनी एचएसबीसी आणि डराशॉसारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही काम केलं आहे.

व्यवसायाने मॅनेजिंग कन्सलटंट असलेल्या श्वेता यांना कॉंग्रेसने मणिनगर जागेसाठी भाजपच्या सुरेश पटेल यांच्या विरोधात उभे केले आहे. पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांसमोर श्वेता यांना उभे केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.Loading…
Loading...