कॉंग्रेस देणार फेरीवाल्यांना कराटे प्रशिक्षण

मनसैनिकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसचा पुढाकार ?

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांच्या प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा आणखी चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत कारण फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणीनंतर काँग्रेसनं आता फेरीवाल्यांना बचावासाठी म्हणून मार्शल आर्टचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार फेरीवाल्यांच्या स्वसंरक्षणासाठी काँग्रेस शहरात मार्शल आर्टसचे कोर्स सुरू करण्याची योजना आखत आहे.मात्र मनसैनिकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घेतला असल्याची चर्चा आहे. रेल्वे स्थानकांवर बेकायदेशीररित्या बसलेल्या फेरीवाल्यांना मारहाण झाल्यानंतर फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी काँग्रेसने हे कोर्स सुरू करण्याचे योजले आहे.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी म्हटले की त्यांच्या पक्षाकडून काही मार्शल आर्ट्स तज्ज्ञांनी सादर केलेला प्रस्ताव विचारात घेण्यात आला आहे. अद्याप काहीही निश्चित करण्यात आले आहे. आम्ही विक्रेत्यांना प्रशिक्षित करण्यासाठी काही कुंफू आणि कराटे तज्ज्ञांशी बोलत आहोत, असेही सांगितले.

You might also like
Comments
Loading...