fbpx

माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा काँग्रेस प्रक्षात प्रवेश

धनंजय धार्मिक
मुंबई- माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
धनंजय धार्मिक मुख्य आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होते. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली ते अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सनदी सेवेतील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. के. सी. पाडवी, आ. धनाजी अहिरे, उत्तम खोब्रागडे, माजी खा. सुरेश टावरे, माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, रमाकांत म्हात्रे, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश काँग्रेसचे सचिव जिशान अहमद, राजाराम देशमुख उपस्थित होते.