१९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता – गांधी

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा – दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. शुक्रवारी ब्रिटनच्या संसदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना गांधी यांनी हा दावा केला आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?

१९८४ सालच्या त्या हिंसाचाराबद्दल माझ्या मनात कुठलाही गोंधळ नाहीय. ती एक दु:खद घटना होती. वेदनादायी अनुभव होता. तुम्ही म्हणाल कि, काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होता. पण मी तुमच्या मताशी सहमत नाही .

मनमोहन सिंग आमच्या सर्वांच्या वतीने बोलले. मी स्वत:हा हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय असतात हे मला चांगले ठाऊक आहे. पृथ्वीवर कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारच्या हिंसाचार करण्याला माझा विरोध आहे. जेव्हा कोणाला वेदना होतात तेव्हा ते पाहून मला दु:ख होते. त्यामुळे मी शीख विरोधी दंगलीचा निषेध करतो आणि जे कोणी अशा प्रकारच्या हिंसाचारात सहभागी आहेत त्यांना शासन झालेच पाहिजे.