राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणणे कॉंग्रेस नेत्याला पडले महागात; पक्षातून हकालपट्टी

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हणणे एका कॉंग्रेस नेत्याला चांगलच महागात पडले आहे. युथ काँग्रेसचे महासचिव ब्रम्हप्रकाश बिश्नोई यांनी राहुल गांधींना त्यांच्या व्हॉट्अॅपवर पप्पू म्हटलं आहे. ब्रम्हप्रकाश बिश्नोई केशव चंद्र यादव यांना राजस्थानच्या युथ काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर नाराज होते. या निर्णयावरील नाराजी व्यक्त करण्यासाठी बिष्णोई यांनी ग्रुपमध्ये मेसेज केला की, आता समजलं राहुल गांधींना पप्पू का म्हणतात ? यानंतर ब्रम्हप्रकाश बिश्नोई यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्याच ग्रुपमध्ये युथ काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र कादयानसुद्धा सहभागी होते. बिश्नोई यांचा हा मेसेज लगेच व्हायरल झाला. त्यानंतर १४ मे ला संध्याकाळी बिश्नोई यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. बिश्नोई यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पक्षाने म्हटलं आहे.