काँग्रेस पक्ष शहीद करकरे कुटुंबियांच्या पाठीशी : सचिन सावंत

टीम महाराष्ट्र देशा- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाल्या की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने शहीद करकरेंना देशद्रोही ठरवले आहे त्यामुळे त्यांच्या कुटुबियांना प्रचंड वेदना होत असतील. काँग्रेस पक्ष शहीद करकरे कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला साध्वी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंना देशद्रोही घोषित करण्याचा गुन्हा फक्त भाजपचे लोकच करु शकतात. जो दहशतवाद्यांशी लढताना भारत मातेसाठी प्राण अर्पण करतो. त्याच्याबद्दलचे असे वक्तव्य हा देशातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे. यासाठी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करत भाजपने देशाची माफी मागावी अशी मागणी सुरजेवाला यांनी केली .

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लष्कर आणि शहीदांबद्दल प्रचारामध्ये वक्तव्य करु नये असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. २६/११ हल्ल्यावेळी मुंबईतील जनतेसाठी लढत असताना ते शहीद झाले असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.Loading…
Loading...