जनआक्रोश रॅलीतून राहुल गांधींचा हुंकार: रामलीलावर कॉंग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या काळामध्ये वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, धार्मिक हिंसाचारा विरोधात आज कॉंग्रेसकडून जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आल आहे.

राहुल गांधी हे कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेसकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या सभेच आयोजन करण्यात आल आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर होणार आहे. हि सभा म्हणजे २०१९ निवडणुकांची एक झलक मानली जात आहे. कॉंग्रेसकडून सभेसाठी जोरदार नियोजन करण्यात आल असून स्व:त प्रियंका गांधी आयोजनावर लक्ष ठेवून आहेत.