कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याना पोलीस कोठडी

टीम महाराष्ट्र देशा –  मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.  कार्यलयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसेच्या आठ जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. किला कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

bagdure

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश छिल्ले, विशाल कोकणे, हरिश सोळुंकी, दिवाकर पडवळ यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीतच राहावं लागणार आहे. मनसेने काल पुन्हा कॉंग्रेस कार्यालयावर शाई फेक केली होती याबरोबरच संजय निरुपम यांच्या घराबाहेर पोस्टर बाजी देखील केली होती. मनसे – कॉंग्रेसच्या या आंदोलनाला रोज नवीन वळण लागत आहे.

You might also like
Comments
Loading...