संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर

किला कोर्टाने आठही जणांना सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती

मुंबई : मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.मात्र एक महिन्याभर दर आठवड्याला आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.किला कोर्टाने ह्या आठही जणांना सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमचुलक्यावर या आठही जणांना सशर्त जामीन मिळाला आहे.काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक केली होती.