राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद रिंगणात

पुणे : राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता विरोधीपक्षांकडून काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद हे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यातून माघार घेतली असून विरोधकांनी एकमताने काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी भाजपप्रणीत ‘रालोआ’चा उमेदवार म्हणून जनता दल (संयुक्त) चे खासदार हरिवंश नारायण सिंह यांचे नाव निश्चित झाल्यानंतर विरोधकांचा उमेदवार कोण या चर्चेंना आता पूर्णविराम मिळाला आहे.राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी १२३ मतांची गरज आहे. भाजप ६९ जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्र पक्ष आणि अपक्ष अशी तोडजोड करून ११५ पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण १३ खासदार असलेलीAIDMK कुठल्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट नाही.
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी 9 ऑगस्टला निवडणुका होणार आहेत. सभापती एम वेंकैया नायडू यांनी राज्यसभेत याची घोषणा केली. यासाछी बुधवारी 8 ऑगस्टला 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

वंदना चव्हाण , देसाईंचा ‘मराठी’बाणा: तर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची हिंदीतून शपथ