चंद्रपुरात कॉंग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसमधील नियोजनशून्यता आणि अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसने चंद्रपुरातील उमेदवार बदलला असून, आता शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्याची नामुष्की कॉंग्रेसवर ओढवली आहे.

काल कॉंग्रेसने उमेदवारांची नववी यादी जाहीर केली. याआधी चंद्रपुरात काँग्रेसने आधी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आणि धानोरकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. ती मागणी काँग्रेसच्या वरिष्ठांनी मान्य करत धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली.

यासर्व प्रकारामुळे विनायक बांगडे हे चांगलेच नाराज झाले असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक कॉंग्रेस नेत्यांवर शरसंधान केलं आहे. बांगडे यांची नाराजी कॉंग्रेसला चांगलीच महागात पडू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.