ऐतिहासिक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना लढणार बलाढ्य भाजपाच्या विरोधात

congress ncp shivsena

फुलंब्री – फुलंब्री नगर पंचायतीसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. आज सकाळी ७.३० ला सुरू झालेले मतदान सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे. नगर पंचायतीमध्ये १४ हजार १२४ मतदार १७ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत , अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी व फुलंब्री नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे निवडणूक लढवत आहेत आणि फुलंब्री नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ उभे आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिरसाठ व ठोंबरे यांच्यातील लढत काटे की टक्कर होणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे. फुलंब्री नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकात पहिला व ऐतिहासिक नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता फुलंब्रीकरांना लागलेली आहे . उर्वरित १७ सदस्यांच्या जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात भाजपचे १७, आघाडीचे १७, एम.आय.एम. २, रिपाइं (डी)२ आणि ७ जागांवर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.