‘काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना एकत्र आले तरी भाजपच जिंकेल अशी तयारी करा’ : अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाविरोधात एकत्र येण्याची तयारी काँग्रेस व अन्य पक्षांनी चालवली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र येतील. शिवसेनेची निश्चित भूमिका काय असेल माहीत नाही; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना हे तिन्ही पक्ष मिळून जरी लढले तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार विजयी होईल, अशी तयारी प्रत्येक मतदारसंघात करावी, अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मुंबईत रविवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश

शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी असल्याची भाषा भाजपा नेते करत असले तरी स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा आराखडा भाजपाने तयार केला आहे. अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात प्रदेश पदाधिकारी व विस्तारकांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनय सहस्रबुद्धे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक कामांचा आराखडा तयार करण्यात आला. यावेळी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करतानाच मित्रपक्ष सोबत आले तर उत्तमच, पण नाही आले तरी सारखेच मन लावून काम करा.पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दिलेली जबाबदारी चोख पार पाडा, अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश