पुणे महापालिका ‘रिंग’ प्रकरण: विरोधी पक्षांचे मुख्य सभेत आंदोलन

पुणे: आपल्या मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळाव यासाठी केलेली ‘रिंग’ तोडणा-या ठेकेदारांना सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने दमबाजी करण्याचे प्रकरण समोर आल आहे. नगररोड भागातील भाजप नगरसेविकेच्या पतीने एका ठेकेदाराला धमकावल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर आता पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आल. यावेळी निविदा प्रकियेत रिंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.Loading…
Loading...