fbpx

पाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी

टीम महाराष्ट्र देशा : पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपमध्ये गेलेले अनेक नेते पुन्हा स्वगृही येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत आपली नौका पार लावण्यासाठी या नेत्यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीला रामराम केला होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करणार असल्याचं बोलल जात आहे.

लोकसभेची सेमीफायनल म्हणून समजल्या गेलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच राज्यामध्ये देखील भाजप विरोधात जनमत होताना दिसत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता भाजपवासी झालेले अनेक नेते कॉंग्रेस – राष्ट्रवादीमध्ये परतण्याची शक्यता आहे.

खानदेशातील भाजपचा तर मराठवड्यातील शिवसेनेचा मोठा नेता कॉंग्रेस राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.

सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीची नवी जबाबदारी

भाजपचे अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात

गड आला पण सिंह गेला,तीन मोठ्या राज्यात आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसला मिझोरममध्ये मोठा धक्का