२०१९ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत आज निर्णय ?

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेनं यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं असल्याने आता महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता प्रस्तापीत करण्यासाठी या दोन्ही पक्षाने एकत्रित ताकद लावण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यासाठी आज मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्व आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत काही निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत.

You might also like
Comments
Loading...