काँग्रेस-राष्ट्रवादी सोडणार भारिपला ८ जागा?

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. युती आणि आघाड्यांच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने २० – २० जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. तर ८ जागा या प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीला सोडणार आहेत.

येत्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे तर राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने समविचारी पक्षांना एकत्र घेवून महाआघाडी केली आहे. या महाआघाडीत भारिपला म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांना देखील सामावून घेण्याच्या चर्चा सतत सुरु होत्या. पण आता राष्ट्रवादी ने ४ कॉंग्रेसने ४ अशा एकूण ८ जागा भारिपला सोडण्याची शक्यता आहे. या राजकीय चाली मुळे महाघाडीला याचा फायदा नक्कीच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान प्रकश आंबेडकर यांनी कॉंग्रेसमध्ये भाजपला हरवण्याची ताकद नसल्याची टीका केली होती. त्यामुळे कॉंग्रेसला आम्हाला महाआघाडीत घ्यावेच लागणार असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला होता.