समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात आघाडीच्या नेत्यांची भाकपसोबत चर्चा

टीम महाराष्ट्र देशा – आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत चर्चा केली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला काँग्रेसच्या वतीने खा. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खा. राजू शेट्टी तर भाकपच्या वतीने तुकाराम भस्मे उपस्थित होते.Loading…
Loading...