fbpx

तिजोरीची लूट करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे जनतेला फसविण्याचे कारस्थान!

sudhir mungantiwar

सावंतवाडी : प्रजासत्तक दिनी सर्व राजकीय पक्षांकडून संविधान बचाव रॅली दरम्यान सर्व राजकीय नेते रस्त्यावर उतरले होते. यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी नेत्यांवर टीका केली. ते सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील भाजपा सरपंच, उपसरपंच सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आणीबाणी देशावर लादणाऱ्यांनी संविधान बचावासाठी रस्त्यावर उतरणे दुर्दैवी आहे. गेल्या १५ वर्षांत राज्याच्या तिजोरीची लुट करून खडखडाट करणारे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या फसव्या टिकेला जनता थारा देणार नाही. त्यांनी तिजोरीत खडखडात केला असला तरी आमच्या सरकारने तिजोरीत खणखणाट केल्याने विकास निधीसाठी भरपूर पैसा आहे. तिजोरीची लूट करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला पुन्हा फसविण्याचे कारस्थान रचले आहे. असे बोलत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी टीकास्त्र सोडले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कितीही देव पाण्यात बुडवून ठेवले तरी मोदीच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी ताकदीने केंद्र व राज्यात भाजपाचेच सरकार येणार आहे. अधिकारी विकास योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवत नसतील तर भाजपाने संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास पोहोचवा. जनतेची कामे केलीत तरच जनता भाजपला स्वीकारेल अशा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

1 Comment

Click here to post a comment