fbpx

विधानसभेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी ५० जागांचा आकडाही गाठू शकणार नाही : गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा :आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी ५० जागांचा आकडाही गाठू शकणार नाही. असे भाकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.येत्या २३ मे ला लोकसभा निवडणुकीचा लागणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागून आहे. तर दुसरीकडे राज्याची विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

याचदरम्यान, भाजपची मुंबईत दुष्काळाचा आढावा आणि निवडणूक या विषयावर बैठक झाली. या बैठकीत दुष्काळासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकी नंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी, भाजपा निवडणूक लढण्यासाठी सदैव तत्पर असते. एका एका विधानसभा मतदार संघात भाजपाची १० हजार कार्यकर्त्यांची टीम तयार आहे. असे त्यांनी म्हंटले.
इतकेचं नव्हे तर, या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला ५० जागाही मिळणार नाहीत. त्यांची तशी परिस्थिती आहे. त्यामुळे आघाडी तेवढा आकडाही गाठू शकणार नाहीत. असेही महाजन यांनी म्हंटले.