मी जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार : थोरात

Enrichment of everyone's life due to education - Balasaheb Thorat

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनतर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली आहे.

या जबाबदारीविषयी बोलताना थोरात यांनी ‘प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच  ‘आमच्या पक्षातून काही लोक गेले. पण जेव्हा कोणी पक्ष सोडत असतं त्याच्याजागी नवीन लोकांना संधी मिळून तरुण नेतृत्व निर्माण होत असतं. त्यामुळे गेलेल्या लोकांची चिंता नाही. आम्ही सर्व नेते आता एकदिलाने काम करून आगामी काळात महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणू असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी तर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.