fbpx

‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज ठाकरेंचा फायदा घेता आला नाही’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालारून मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी कॉंग्रेस -राष्ट्रवादी आघाडीवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंनी तयार केलेल्या वातावरणानंतरसुद्धा आघाडीचे कार्यकर्ते अपयशी ठरले आहेत. असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेचं निवडणुकीमध्ये महाआघाडीला विखे-पाटील, मोहिते पाटलांना सांभळता आलं नाही. असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, नेटिजन्स आणि उद्धव ठाकरेंना दखल घ्यावी लागते याचा अर्थच हा आमचा विजय आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, लोकसभेत आम्ही उतरलो नाहीत परंतू, विधानसभेत जास्त ताकतीने उतरू असेही देशपांडे यांनी म्हंटले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक लढला नाही. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर, लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी भाजपची पोलखोल केली.

राज ठाकरे यांच्या सभेचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या आतापर्यंतच्या निकालात झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून आले.