कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हव्या आहेत ‘इतक्या’ जागा

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केल्याचे समजते. आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसांच्या बैठकीला मुंबईत सुरुवात झाली आहे . पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकांची घोषणा शनिवारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला महत्त्व आले आहे