सांगलीमध्ये भाजपचं फोडाफोडीचं राजकारण यशस्वी होणार नाही – जयंत पाटील 

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीत  भाजपाने अन्य पक्षातील लोकांना पक्षात घेऊन महापालिका जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. नगरसेवक आणि मतदारांना आमिषे दाखवून आपलेसे करण्याचे उद्योग यशस्वी होणार नाहीत. भाजपाची ताकद केवळ ८ ते ९ सदस्य निवडून येतील एवढीचं आहे. मात्र, फोडाफोडी करूनही त्यांची सदस्यसंख्या १८ वर जाणार  नसल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. ते  राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, सांगलीत पूर्ण बहुमताने सत्ता काबीज करायची असेल, तर दोन्ही काँग्रेसला आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, मात्र तसं न झाल्यास राष्ट्रवादी सांगली महापालिकेची निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकदीने लढवणार आहे.