युतीचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सुरु आहे ‘या’ पक्षांसोबत बोलणी

टीम महाराष्ट्र देशा- आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, यांच्यात आघाडी झाली असून सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत चर्चा चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पाच ते दहा जागांच्या अदलाबदलीचा निर्णय आज मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्याचा आपला दौरा पूर्ण झाला असून सर्वत्र राज्य सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचं दिसून आलं. शेतकरी आणि तरूण यांच्यात मोठा असंतोष असल्याचं पवार म्हणाले.

तत्पूर्वी, पवार यांनी औरंगाबाद तसंच जालना इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात मार्गदर्शन केलं. जालना इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना त्यांनी हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या