दोन्ही पक्षातील कटुता दूर ; काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आणि येत्या निवडणुकीतल्या आघाडीबाबत चर्चा झाली आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीत कटूता राहिली नसून आता आघाडीबाबत केंद्रीय पातळीवर शिक्कामोर्तब होणं बाकी असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे. या बैठकीत अधिवेशनात एकत्र येऊन विविध विषयांवर सरकारविरोधात उभे राहण्याबाबत चर्चा झाली. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. आघाडीची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल अशी माहितीही चव्हाण यांनी दिली. तसंच प्रकाश आंबेडकरांनीही आघाडीत यावं त्यांचं स्वागत आहे. असं निमंत्रणचं चव्हाण यांनी दिलंय.

Loading...

सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. भविष्यात एकत्र कसे काम करायचे याची चर्चा झाली. दोन्ही पक्षातील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय.

या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार