नक्षलवादी संघटनांशी काँग्रेसचे लागेबांधे; भाजपचा आरोप

देशात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी काँग्रेसने हातमिळवणी केली असून २०१९ मध्ये मोदी सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेल्या वर्षी झालेले भीमा-कोरेगावमध्ये झालेले आंदोलन उत्स्फूर्त नव्हते, तर शहरी नक्षलवादी संघटनांनी कृत्रिमरीत्या घडवून आणले होते, असं देखील भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं.

या आरोपामागील पुरावा म्हणून पात्रा यांनी कॉम्रेड रोना विल्सन यांना कॉम्रेड एम या नावाने लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ‘कमिटी फॉर रिलिज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर’ (सीआरपीपी)च्या वतीने लिहिले अहे. कॉम्रेड रोना यांना बुधवारी नवी दिल्लीतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही या पत्राचा उल्लेख झाला होता. पुणे पोलिसांकडेही संबंधित पत्र असल्याचा दावा पात्रा यांनी केला. या पत्रात नक्षलवाद्यांना काँग्रेस गुप्तपणे मदत करत असून देशात अराजक माजवण्याचा कट करण्यात आला असल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...