fbpx

जागावाटपासाठी आघाडीत पुढील आठवड्यापासून रंगणार चर्चेच गुऱ्हाळ

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आता राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या बाबतीत दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी सावधानता म्हणून पुढील आठवड्यातच दोन्ही पक्षात जागा वाटपावर बैठका सुरु होणार आहेत.

यासंदर्भात पहिली बैठक येत्या मंगळवारी मुंबईत होते आहे. या दोन पक्षांमधील जागा वाटपाची बोलणी झाल्यानंतर मग इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा देखील समावेश आहे.