fbpx

काँग्रेस खासदारांचे चक्क संसदेच्या छतावर चढून आंदोलन

congress mp

नवी दिल्ली: विरोधकांनी आज मोसूलमध्ये झालेली भारतीयांची हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक कारणांवरून लोकसभेत गोंधळ घातला. दरम्यान काँग्रेसचे तीन खासदार चक्क संसदेच्या छतावर चढले, तिथे चढून त्यांनी आपले आंदोलन आणि सरकारविरोधी घोषणाबाजी सुरु ठेवली.

जे भारतीय इराकमध्ये मारल्या गेले. त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यायलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर केली आहे. तरीही काँग्रेसच्या खासदारांनी संसदेत गदारोळ घातला आणि गच्चीवर चढून आंदोलनही केले. मात्र तरीही काँग्रेसचे तीन खासदारांनी चक्क संसदेच्या छतावर चढून घोषणा दिल्या.