fbpx

…तर नाविलाजाने सिंधी समाजालाही वेगळ्या प्रांताची मागणी करावी लागेल

rashtrgeet

पुणे- राष्ट्रगीतातून ‘सिंध’ हा शब्द वगळण्याच्या काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांच्या मागणीवर पुण्यातील सिंधी समाजाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. केवळ आम्हाला प्रांत नसल्यामुळे जर अश्या प्रकारची मागणी केली जात असेल तर नाविलाजाने सिंधी समाजालाही वेगळ्या प्रांताची मागणी करावी लागेल अशी संतप्त भावना कराची एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक रामनानी यांनी महाराष्ट्र देशा बरोबर बोलताना व्यक्त केली.

 या संदर्भात सिंधी समाजाचे शिष्टमंडळ लवकरच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेवून अशी कोणतीही मागणी किंवा ठराव संसदेत कॉंग्रेसने करू नये अशी विनंती करणार असल्याचं रामनानी यांनी सांगितले.याच संदर्भात पुण्यात सिंधी समाजाची बैठक झाली या बैठकीत या सगळ्या प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला.

रविंद्रनाथ टागोर लिखित ‘जन गन मन…’ या भारताच्या राष्ट्रगीतातील ‘सिंध’ हा शब्द वगळून त्याऐवजी ‘ईशान्य भारता’चा राष्ट्रगीतातील ‘सिंध’ शब्द हटवून ‘ईशान्य भारता’चा उल्लेख करा; काँग्रेस खासदाराची मागणीसमावेश करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी खासगी प्रतिनिधी ठराव शुक्रवारी राज्यसभेत मांडला.

राष्ट्रगीतात बदल करण्याबाबत बोरा यांनी राज्यसभेत मांडलेल्या या ठरावात तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, स्वातंत्र्यापूर्वी रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या ‘जन गण मन…’ या काव्याला स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी भारताचा भाग असणाऱ्या ‘सिंध’ प्रांताचा यात उल्लेख करण्यात आला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा भाग पाकिस्तानात गेला असून तो आता भारताचा भाग राहिलेला नाही. तर, ईशान्येकडील सात राज्ये ही भारताचा महत्वाचा भाग आहेत. या राज्यांसंदर्भात राष्ट्रगीतात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ‘सिंध’ हा शब्द हटवून त्याऐवजी ईशान्य भारतासंबंधी उल्लेख राष्ट्रगीतात करण्यात यावा अशी मागणी बोरा यांनी केली आहे .

काय म्हणाले दीपक रामनानी
भारताची फाळणी झाली तेव्हा आम्ही पाकिस्तानातून भारतात आलो. आजपर्यंत आम्ही कोणतीही मागणी सरकारकडे केली नाही. राष्ट्रगीतातील सिंध हा शब्द आमच्या अस्मितेचा आणि दैदिप्यमान इतिहासाचे प्रतिक असून आज तोच शब्द काढून टाका अशी मागणी होणे दुर्दैवी आहे. या संदर्भात सिंधी समाजाचे शिष्टमंडळ लवकरच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेवून अशी कोणतीही मागणी संसदेत कॉंग्रेसने करू नये अशी विनंती करणार आहोत.केवळ आम्हाला प्रांत नसल्यामुळे जर अश्या प्रकारची मागणी केली जात असेल तर नाविलाजाने सिंधी समाजालाही वेगळ्या प्रांताची मागणी करावी लागेल. 

1 Comment

Click here to post a comment