काँग्रेससचे खा. रंजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने तीन जणांना चिरडले

पाटणा : काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार रंजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने तीन जणांना चिरडले. यात दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सुपोल येथील निर्मली-सिकरहट्टा भागात ही घटना घडली. निर्मली शहराध्यक्ष रामप्रवेश यादव यांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रंजन यांच्या ताफ्याने सिकरहट्टा गावातील दोन मुलांना आणि एक वयवृद्ध व्यक्तीला चिरडले. रंजन हे बिहारमधील पूरग्रस्त क्षेत्रांची पाहणी करण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येते . पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांची रंजन यांनी पाहणी केली असून पूरग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

You might also like
Comments
Loading...