मोदीजी जानेवाले है , राहुलजी आनेवाले है ! – अशोक चव्हाण

Ashok Chavan

टीम महाराष्ट्र देशा : “भाजपचा तीन राज्यातील पराभव म्हणजे तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा आणि धनशक्तीवर जनशक्तीचा विजय आहे. भाजपची घरवापसी निश्चित आहे, मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है. महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही काही महिन्यांसाठीच असेल”, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील काँग्रेस कार्यालयात आज अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं.

यावेळी अशोक चव्हाण आणि विखे पाटील यांनी तीन राज्यातील विजयाबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं अभिनंदन केलं. तसंच भाजपवर तुफान हल्लाबोल केला.

अशोक चव्हाण म्हणाले, “महागाई, अत्याचार, बेरोजगारी या सर्व प्रश्नांवर भाजप सरकार अपयशी ठरलं आहे. भाजपने उद्योगपतींसाठी सत्ता वापरली. तिरस्कारावर प्रेमाचा, अहंकारावर नम्रतेचा, धनशक्तीवर जनशक्तीचा हा विजय आहे. लोकविरोधी भाजप सरकारविरोधात हा जनतेचा कौल आहे, हा लोकशाहीचा विजय आहे”
दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र भाजपलाही आव्हान दिलं. राज्यातील फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांसाठी हे सरकार असेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.